
जळगाव जामोद पोलिसांची मोठी कामगिरी! तीन वर्षांपूर्वीची मंदिर चोरी उघड; बिरोबाचा चांदीचा मुकुट आरोपीच्या ताब्यातून जप्ततीन वर्षे गूढ बनून राहिलेल्या मंदिर चोरीचा अखेर उलगडा
जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई
पोलिसांचा ‘मास्टर स्ट्रोक’जळगाव जामोद | प्रतिनिधीजळगाव जामोद पोलिसांनी तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंदिर चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पिंपळगाव काळे येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिरातून सन २०२३ मध्ये चोरीला गेलेला चांदीचा मुकुट अखेर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केला असून, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये पिंपळगाव काळे येथील बिरोबा मंदिरातून सुमारे १८० ग्रॅम वजनाचा व अंदाजे ₹३६ हजार किमतीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास गेल्या तीन वर्षांपासून सुरू असतानाही आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र जळगाव जामोद पोलिसांनी सातत्याने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि उपलब्ध पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून अखेर आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीला गेलेला चांदीचा मुकुट जप्त केला.ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या नेतृत्वात तपासी अधिकारी अमोल पंडित यांनी अथक परिश्रम घेत या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला.तीन वर्षांपासून गूढ बनून राहिलेल्या या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत चोरीचा मुद्देमाल परत मिळविण्यात जळगाव जामोद पोलिसांना आलेले यश हे त्यांच्या तपासकौशल्याचे द्योतक मानले जात आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक कायम असल्याचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे.
