श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत वासुदेवजी महाराज यांचा १७ वा ब्रम्हलिन सोहळा संपन्न

श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत वासुदेवजी महाराज यांचा १७ वा ब्रम्हलिन सोहळा संपन्न

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

श्री संत गजानन महाराज यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टाशिष्य श्री संत भास्कर महाराज व वासुदेव महाराज संतद्वयाचा पालखी सोहळा श्री क्षेत्र आकोली जहागीर येथून आषाढी वारी करीता ६५० कि मी चा पायी प्रवास करीत भगवंताच्या नामचिंतनाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि.२० जुलैला पोहचला श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रीमंत अहील्यादेवी होळकर वाडा येथे मुक्कामाला असुन दि २२ जुलै ते २९ जुलै पर्यंत आयोजित सप्ताह दरम्यान आषाढ शुद्ध दशमीला ह.भ.प.पुंडलिक महाराज जायले व आषाढ शुद्ध एकादशीला पहाटे श्री संत वेदशास्त्रसंपन्न वासुदेवजी महाराज यांचा १७ वा ब्रम्हलिन सोहळा संपन्न झाला.त्यानिमित्य श्रींचे कुलोत्पन्न ह.भ.प.अशोक महाराज जायले सपत्नीक संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर जायले यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक व महाआरती करण्यात आली.उपस्थित संस्थेचे विश्वस्त शंकरराव कोल्हे माधवराव भांबुरकर सचिन अढाऊ कुलदिप गणेशपुरे प्रमोद रेळे होळकर वाड्याचे मॅनेजर चंदुभाऊ ह.भ.प.सुधाकर जायले गुरूजी श्याम अढाऊ महाराज मंडळी श्रींचे विणेकरी ह.भ.प.मोहन महाराज रेळे श्रींचे पुजारी ह.भ.प.पंकज महाराज आगरकर ह.भ.प.नागोराव महाराज चौखंडे ह.भ.प.कोंडीराम महाराज नागरगोजे ह.भ.प.सुरेश महाराज मानकर ह.भ.प.प्रकाश महाराज नेवारे ह.भ.प.शरद महाराज खंडारे विठ्ठल महाराज केंद्रे अविनाश महाराज कडु ह.भ.प.शिवा महाराज रेचे ह.भ.प.गौरव महाराज बोर्डे ह.भ.प.अनिकेत महाराज दही धनंजय महाराज जायले धनंजय महाराज बोर्डे पवार महाराज रुषीकेश महाराज सोनोने अवधूत महाराज थोरवे योगेश महाराज नागरगोजे रवि सोळंके संजय वसु सेवेधारी मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *