विठ्ठल रुखमीनी मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी केली गर्दी.विठु माऊलीच्या नामघोषाने दुम दुमली हिवरखेड नगरी

विठ्ठल रुखमीनी मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी केली गर्दी.विठु माऊलीच्या नामघोषाने दुम दुमली हिवरखेड नगरी

प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर

हिवरखेड येथील चारशे वर्षापुर्वीचे पुरातन असे पांडुरग सस्थान विठ्ठल रुख्मीणी मंदीरात आज पहाटे पासूनच आषाढी एकादशी नीमित्त दर्शनाला याञेचे स्वरुप प्राप्त झाले होते तर भावीकानी रांगेत लागून विठूमाऊलिचे दर्शन करत होते हिवरखेड नगरीचे आराध्य तसेच पंचक्रोशीत प्रसीद्ध असे या मंदिरात नेहमीप्रमाने बारमासी कार्यक्रम पार पडत असतात तर मंदीर ट्रस्टी कडुन मंदीराचे आतले जिर्णोद्वार ट्रस्टीच्या आव्हाहनाला लोकसहभाग साद देत आहेत तर मंदीरात आजआषाढी एकादशी पर्वावर सप्ताहात अंखड विना तसेच काकडा हरिपाठ नेहमी चालू असून आज मंदीर ट्रस्टी व लोकसहभागातुन दिवसभर पंधरा ते सोळा हजाराचे वर लोकानी विठू माऊलीचे दर्शनार्थीना साबुदाना शेगंदाने ऊसळ केळि चे वाटप केले तर दूपारी चार वाजता मंदीर समीती चे वतीने सालाबाद प्रमाणे सजविलेल्या ट्रक्टरवर वीठ्ठल प्रतीमेची मिरवनूक शहराचे प्रमूख मार्गावरून काढन्यात आली मिरवनूक मार्गात रागोंळी काढून स्वागत तथा ठीक ठीकानी रस्त्यात फराळ चहा पान ची व्यवस्था गावातिल विवीध दुर्गादेवी गणपती मंडळा कडुन तसेच भाविका कडुन विठ्ठल भक्त साठी केली होती तर मिरवनूकीत विठ्ठल मदींरचे वारकरी टाळकरी माळकरी च्या सहाय्याने व गायञी महिला भजनी मडळ, आसरा माता भजनी मंडळ, संत रूपलाल महिला भजनी मंडळ, चंडिका चौक महिला भजनी मंडळ, दुर्गामाता महीला भजनी मडळचा यामधे सहभाग लाभला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *