डिजिटल शाळेत चिमुरडे अवतरले विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांच्या रुपात

डिजिटल शाळेत चिमुरडे अवतरले विठ्ठल, रखुमाई आणि वारकऱ्यांच्या रुपात

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मांगुळ झनक येथील शांताबाई रामरावजी झनक डिजिटल शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त चिमुरडे अवतरले विठ्ठल, रखुमाई आणि वारकऱ्यांच्या रुपात अवतरली होती. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती पूजनाने आणि आरतीने झाली.याप्रसंगी शाळेतील लहान विद्यार्थी विठ्ठल, रखुमाई आणि पारंपरिक वारकरी पोशाखात नटून थटून शाळेत आले होते. विद्यार्थ्यांनी परिधान केलेले धोतर, कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर बुक्का-चंदन आणि गळ्यात तुळशीची माळ अशा हुबेहूब वारकरी पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काही चिमुरड्यांनी हातात टाळ आणि खांद्यावर भगवी पताका (ध्वज) घेऊन विठ्ठलाचा गजर केला. विठ्ठल-रखुमाई आणि वारकऱ्यांच्या रुपातील या विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानबा तुकाराम’ अशा भजनांचा गजर करत संपूर्ण शाळा परिसर भक्तीमय करून सोडला.शाळेच्या डिजिटल वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे आणि पंढरपूरच्या वारीचे महत्त्व सांगणारी विशेष चित्रफीत (व्हिडिओ) दाखवण्यात आली. या सोहळ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर सांस्कृतिक मूल्यांचे आणि परंपरांचे संस्कार होण्यास मदत होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. या कल्पक उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *