वस्तापुर-मानकरी शेतशिवारात रान डुक्कराचा शेतमजुरावर हल्ला शेतमजूर गंभीर जखमी

वस्तापुर-मानकरी शेतशिवारात रान डुक्कराचा शेतमजुरावर हल्ला शेतमजूर गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी : देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम वस्तापुर-मानकरी शेतशिवारात रान डुक्कराने हल्ला चढवल्याची घटना घडली.यामध्ये शेतमजूर रमेश श्रीराम कासदे वय ६३ वर्ष हे स्वतःच्या शेतात सकाळी फवारणीसाठी गेले असता फवारणी करीत असताना जंगली डुक्कराने त्यांच्यावर एकाएकी हल्ला चढवला.यामध्ये रमेश कासदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय अकोट येथे उपचार सुरू आहे.या आधी सुध्दा या परिसरात जंगली वन्य प्राण्यांनी हल्ले चढवल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे या परिसरात सद्या भीतीचे वातावरण असून शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी,हे पूर्णपणे भयभीत झाले आहे.त्यामुळे येथील शेतकरी,शेतमजूर,यांनी वन्य प्राण्यांचा ताबडतोब कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *