
दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ अकोट मध्ये सर्वपक्षीय भव्य रॅली हजारो विद्यार्थी,विद्यार्थिनी,रॅलीत सहभागी,पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणी,व भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ अकोट मध्ये आज सर्वपक्षीय भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम नरसिंग महाराज पटांगणातून या रॅलीला सुरुवात झाली.मुख्य मार्गाने निघून अकोट येथील पोपटखेड रोडवरील नवीन तहसील कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर अकोट यांना निवेदन देण्यात आले आहे.या रॅलीमध्ये सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,विद्यार्थी, विद्यार्थिनी,हजारोच्या उपस्थितीत बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.विद्यार्थ्यांनी वंदे मातरम,इन क्लाब जिंदाबादचे नारे दिले.अकोट येथील सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज,व रामपाल महाराज हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.रॅली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहरचे ठाणेदार किशोर जुनघरे यांचे उपस्थितीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
