एसईसी प्रमाणपत्रासाठी स्थानिक वास्तव्याच्या दाखल्याऐवजी वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक

एसईसी प्रमाणपत्रासाठी स्थानिक वास्तव्याच्या दाखल्याऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि. २४ जुलै (जिमाका) : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ (२) अन्वये सार्वजनिक सेवा वाहनांच्या एसईसी प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या स्थानिक वास्तव्याच्या दाखल्याऐवजी आता वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी दिली आहे.
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि. १७ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सार्वजनिक सेवा वाहनांच्या एसईसी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदारांनी स्थानिक वास्तव्याच्या दाखल्याऐवजी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
सर्व वाहनचालक, वाहनमालक, वाहन चालक प्रशिक्षण संस्था तसेच संबंधित नागरिकांनी एसईसी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना स्थानिक वास्तव्याच्या दाखल्याऐवजी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र जोडूनच अर्ज सादर करावा. यामुळे अर्ज प्रलंबित राहणे अथवा नामंजूर होणे टाळता येईल, असेही श्री. मेश्राम यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *