
26 जुलै रोजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजन
मलकापूर प्रतिनिधी दिनेश आसटकार
नागरिकांच्या महसुली व विविध शासकीय कामाचा जलद निपटारा करण्यासाठी 26 जुलै रोजी सकाळी दहा वाजता मराठा मंगल कार्यालय मलकापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले आहे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महसूल विभागासह विविध शासकीय विभागाच्या आयोजनाचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली शिबिराचे उद्घाटन आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे तर महसूल व इतर विभागांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही केली जाणार आहे शिबिरात महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रकांचे वाटप का गावठाणातील नागरिकांना स्वामी मुख्यमंत्री बळीराजा शेत आनंद रस्ते योजनेतील प्रलंबित कामे शासकीय जमिनीवर निवासी अतिक्रमणाची नियमानुसार नियमितिकरण कौटुंबिक वाटणी पत्रकावरील नोंदणी शुल्क माफी जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत त्रुटींचे निराकरण सेवा हमी कायद्यानुसार विविध दाखल्यांचे तात्काळ वितरण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे या शिबिरासाठी सर्व वेळ विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांवर जागेवरच प्रशासकीय कारवाई करणार आहेत त्यामुळे मलकापूर विधानसभा मतदार संघातील नागरिक शेतकरी महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान (तहसीलदार समाधान सोनवणे) यांनी केले आहे
