
मुंदडा विद्यालयात वृक्षदिंडी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
ना ना मुंदडा विद्यालयात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा एक भाग म्हणून वृक्षदिंडी काढण्यात आली. गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी या दिंडीत लहान लहान चिमुकले विद्यार्थांनी वारकरी वेष परिधान केला होता तसेच मुलींनी लुगडे परिधान केले होते टाळ मृदुंग च्या गजरात झाडे लावा हा संदेश देत ही दिंडी ना ना मुंदडा विद्यालयातून गाडगेबाबा नगर परिसरात फिरून ओंकारगिर महाराज मंदिर येथे आली दिंडीला विधिवत वृक्षाची पूजा करून सुरुवात करण्यात आली. दरम्यान झाडे वाचवण्यासाठी वेगवेगळे संदेश तयार करून मुलांनी हातात घेत नागरिकांना दिले तसेच झाडे वाचवण्यासाठी घोषणा देण्यात आल्या अतिशय शिस्तबद्ध रित्या ही पालखी दिंडी गाडगेबाबा नगर परिसरात गेली काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच महाराष्ट्रातील विविध संताच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याचवेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांच्या गाण्यावर नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी पावली व फुगडी सुद्धा खेळली संत ओंकारगिर महाराज मंदिरावर गेल्यानंतर अरुण बळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना साठी नाष्ट्याची व्यवस्था केली होती त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला गावकऱ्यांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. परत ही दिंडी ना ना मुंदडा विद्यालयात आली. त्या ठिकाणी परिसरात वृक्षारोपण केले नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला मुख्याध्यापक दिनेश उंटवाल यांच्या मार्गदर्शनात ही दिंडी काढण्यात आली या दिंडीला यशस्वी करण्यासाठी उप-मुख्याद्यापक संध्या उंबरकर, पर्यवेक्षक गजानन पाटील, सांस्कृतिक प्रमुख अमोल कल्याणकर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केले. या दिंडीत विद्यार्थ्यांचा खूप उत्साह दिसून आला पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
