गामणे मळा, माखमलाबाद येथे रस्त्याच्या कामामुळे कार उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

गामणे मळा, माखमलाबाद येथे रस्त्याच्या कामामुळे कार उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

प्रतिनिधी जळगाव जामोद सुरेंद्र गवई

नाशिकच्या गामणे मळा, माखमलाबाद परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान गुरूवारी रात्री एक कार उलटल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम सुरू असताना एका बाजूचे पार्टिशन (बॅरिकेड) काढण्यात आले होते. तसेच योग्य इशारे, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि रात्रीची पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने चालकाचा अंदाज चुकला आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त करत, “रस्त्यांची कामे होत आहेत ही चांगली बाब आहे, मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य बॅरिकेडिंग आणि इशारा फलक नसल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात,” अशी प्रतिक्रिया दिली.या घटनेनंतर संबंधित विभागाने अपघाताची चौकशी करून आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करावेत, तसेच सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *