आउटसोर्स भरतीत CMYKPY प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य द्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

आउटसोर्स भरतीत CMYKPY प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (CMYKPY) अंतर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तसेच बाह्य यंत्रणे मार्फत आउटसोर्स (कंत्राटी) होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्याने सामावून घेण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज गजानन अवचार यांच्या नेतृत्वात केली आहे. सदरहू निवेदनात नमूद की, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आम्ही सन २०२४–२५ मध्ये विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ११ महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. शासन निर्णयानुसार आम्हाला विविध कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त झाला असून कार्यालयीन कामकाजाची पूर्ण माहिती मिळाली आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात बाह्य यंत्रणे मार्फत आउटसोर्सिंग, कंत्राटी एजन्सी मार्फत संगणक ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, मल्टीटास्किंग सहाय्यक, शिक्षक, नर्सिंग, तसेच इतर विविध पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत अशी माहिती मिळाली आहे. असे निवेदनात नमूद करण्यासोबतच सदरहू योजनेअंतर्गत ११ महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांवर प्राधान्याने सामावून घ्यावे. ज्या कार्यालयांमध्ये आउटसोर्सव्दारे भरती केली जाते, तेथे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य द्यावे. प्रशिक्षणाचा अनुभव लक्षात घेऊन भविष्यातील भरती प्रक्रियेत योग्य ते गुण किंवा प्राधान्याचा लाभ द्यावा. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांच्या रोजगाराबाबत शासनाने स्वतंत्र धोरण जाहीर करावा आश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. सदरहू निवेदनावर अमोल सुखदेव नानोटे, हर्षल रुस्तम उगलमुगले, धनंजय दत्तराव देशमुख, गणेश सुखदेव गायकवाड, शुभांगी प्रकाश मुंढे, दिक्षा माहादेव डुकरे, अनुसया विष्णू वाथे, पायल नारायण सरकटे, संजिवनी भिमराव साळवे, अंजु पुंडलिक लोखंडे आदी प्रशिक्षणार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *