आखीरी सफर चिखलदरा’ चित्रपटाचा मेडशी येथे चित्रिकरणाची सुरुवात

आखीरी सफर चिखलदरा’ चित्रपटाचा मेडशी येथे चित्रिकरणाची सुरुवात

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील मेडशी येथील युवा दिग्दर्शक जयसिंग ठाकूर यांच्या ‘श्री सिताराम प्रेझेट’ या चित्रपट निर्मिती संस्थेने ‘आखीरी सफर चिखलदरा’ या आगामी पहिल्या चित्रपटाचा अधिकृत मुहूर्त व लॉन्च इव्हेंट नुकताच त्याच राहत्या घरी मोठ्या उत्साहात पार पडला. “एक सफर… जो लौटकर हर किसिको बदल देगा” अशी टॅग लाईन असलेल्या या सिनेमाच्या निमित्ताने ‘शूट स्टार्टस टुडे’ म्हणत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ​हा चित्रपट ‘मैत्री, विश्वास आणि अस्तित्वाचा लढा’ या विषया भोवती फिरणारी एक भावनिक, रहस्यमय आणि थरारक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.​मेडशी येथील प्रसिद्ध नागनाथ मंदिर येते महादेवाचे पूजन करून चित्रपटाच्या क्लॅप बोर्डचे अनावरण करण्यात आले.​ चित्रपटातील मुख्य कलाकार आणि पडद्यामागील टीमची अधिकृत ओळख करून देण्यात आली.चित्रपटाचे थरारक आणि रहस्यमय वातावरण दाखवणारे अधिकृत पोस्टर आणि मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. युवा ​दिग्दर्शक जयसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य प्रकल्प साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य मुहूर्त आणि लॉन्च इव्हेंट उत्साहात पार पडला.​गाव खेड्यातून थेट रुपेरी पडद्या पर्यंतचा प्रवास​कोणतीही मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा गॉडफादर नसताना, निव्वळ आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर मेडशी गावातील युवकाने या चित्रपट निर्मितीचे धाडस केले आहे. एका दुर्गम भागात राहून तिथल्या मातीतले अनुभव आणि विचार एकत्र करून ही कथा विणली गेली आहे.​ अति दुर्गम भागात असलेल्या मेडशी गाव खेड्यातील तरुणाच्या विचारातून जन्म घेतलेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. या वेळी उपस्थित जयसिंग ठाकूर (निर्माता /दिग्दर्शक) जावेद धनु भवानीवाले(पटकथा,संवाद लेखक, पब्लिकसिटी व सोशल मीडिया) ,योगेश वानखडे (​प्रॉडक्शन मॅनेजर,कास्टिंग डायरेक्टर) आदित्य वानखडे (​सहाय्यक दिग्दर्शक,प्रॉडक्शन असिस्टंट) प्रवीण पतंगे (​संगीत दिग्दर्शक, बॅकग्राउंड स्कोअर,साऊंड डिझायनर) रामेश्वर आणि अनिल (​गीतकार आणि पार्श्वगायक) शुभम बोचरे आणि संकेत चव्हाण (​छायांकन दिग्दर्शक • कॅमेरा ऑपरेटर • एडिटर्स • कलोरिस्ट • लायटिंग):पहिल्याच चित्रपटासाठी या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.चौकट *ग्रामीण भागातील तरुणाचे धाडस* डोंगराळ व अजिंठा पर्वत रांगेत अतिदुर्गम भाग असलेल्या मेडशी या गाव खेड्यातील एका सर्वसामान्य युवकाच्या मनात रुजलेल्या कल्पनेतून आणि वैचारिक पेरणितून ‘आखीरी सफर चिखलदरा’ या नव्या चित्रपटाची निर्मिती होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांकडे असलेली प्रतिभा आणि जिद्द जर योग्य दिशेने वापरली, तर ते रुपेरी पडद्यावरही कमाल करू शकतात, या चित्रपटाचे पत्रकार जावेद धनु भवानीवाले पटकथा व संवाद लेखक पब्लिकसिटी, सोशल मीडिया सपोर्टर्स मेडशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *