
नागरतास शिवारातून विद्युत व शेती साहित्याची चोरी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील नागरतास येथील शेतशिवारात अज्ञात चोराने विविध शेती व विद्युत साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी डिगांबर अवधूत देवळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार १७ जुलै रोजी सायंकाळ नंतर नागरतास शेतशिवारात अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील ओरीएंट कंपनीचा फॅन, मोटर व सोलर मोटरचे केबल, वायंडिंग तार, ट्रॅक्टरची बॅटरी तसेच टर्मिनल केबल असा एकूण १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिलीप राठोड पुढील तपास करीत असून, अज्ञात आरोपींचा नेहमीच्या गतीने शोध सुरू आहे.
