एस टी महामंडळाने केलेली भाडेवाढ लागू करू नये महेंद्र कुमार बुरड

एस टी महामंडळाने केलेली भाडेवाढ लागू करू नये महेंद्र कुमार बुरड

मलकापूर प्रतिनिधी दिनेश आसटकर

महागाईच्या आधी सर्वसामान्य प्रवाशांच्या आर्थिक गणित विस्कटलेले असताना एसटी प्रशासनाने 13.56 % भाडेवाढ लागू करू नये अशी मागणी जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष एडवोकेट महेंद्रकुमार बुरड यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना 17 जुलै च्या मध्यरात्रीपासून 13.56% भाडेवाढ केली आहे सुधारित दरही पाच रुपयांच्या पटीत असून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सर्वात स्वस्त आणि विश्वासार्थ सार्वजनिक व्यवस्था मानली जाते विद्यार्थी नोकरदार शेतकरी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर एसटीवर अवलंबून आहेत भाडेवाडीचा परिणाम सर्वाधिक दैनंदिन प्रवाशांवर होणार असून मासिक प्रवास खर्चातही वाढ होणार आहे सर्वसामान्य जनतेचा विचार करून यशस्वी महामंडळ प्रशासनाने सदर भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष एडवोकेट महेंद्र कुमार यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *