सोनम वांगचुक प्रकरणी वाशिममध्ये निषेध आंदोलन; संविधानप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने होती उपस्थिती

सोनम वांगचुक प्रकरणी वाशिममध्ये निषेध आंदोलन; संविधानप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने होती उपस्थिती.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव,

दि. १८ जुलै : दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी, वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आज दुपारी ४ वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशिम येथे निषेध आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनाला संविधानप्रेमी नागरिक, विविध सामाजिक संघटना तसेच समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा . भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच विविध कथित परीकेशचीप पेपरफुटी प्रकरणांमुळे प्रभावित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पर्यावरणवादी व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनीही आमरण उपोषण सुरू केले होते.सविस्तर वृत्त असे की,आज दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळी कारवाई जबरदस्ती करून सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले. या कारवाईदरम्यान दिल्ली पोलिसांकडून अभिजीत दिपके तसेच काही कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की व मारहाण झाली.या घटनेचा निषेध करण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशिम येथे कोकरोज जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ता जगदीश मानवतकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संविधानिक मूल्यांचे संरक्षण, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार आणि लोकशाही तत्त्वांचे जतन करण्याची मागणी केली.यावेळी बोलताना जगदीश मानवतकर यांनी शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.या आंदोलनात रवी ठोके, मयुर मानधने, सुधाकर वानखेडे, रामदास कालापाड, अॅड. संतोष केसवाणी, सुरेश कुचेकर, पवन सुतार यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील संविधानप्रेमी नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक, विद्यार्थी तसेच समविचारी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निषेध आंदोलनाचे आयोजन कोकरोज जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ता जगदीश मानवतकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *