
बनावट कागदपत्रांच्या आधारे मृतक मुलाच्या वृद्ध आईची फसवणूक; चौघांविरुद्ध शिरपूर पोलिसांत गुन्हा
जिल्हा प्रतिनिधी गोपाल भिसडे
मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील वारसाहक्काची रक्कम बनावट कागदपत्रांच्या आधारे काढून वृद्ध आईची फसवणूक केल्याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंचळ, ता. रिसोड, जि. वाशिम येथील संतोष शंकर जुनघरे यांचे सन २०१९ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूसमयी स्टेट बँक ऑफ इंडिया, केनवड शाखेतील बचत खात्यात सुमारे ₹२.०६ लाख इतकी रक्कम जमा होती. मृतकाची आई, पत्नी व मुले हे कायदेशीर वारस असताना, आरोपींनी संगनमताने पोलीस पाटील व सरपंच यांना चुकीची माहिती देऊन वारसाचे चुकीचे व बनावट वारस दाखले घेतले. व बँकेतील रकमेवर डोळा ठेवून दाखले बँकेत दिले, त्या दाखल्यांवर विश्वास ठेवून बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोनतीही शाहानीशा करता केवळ मृतक संतोष ची पत्नी उज्वला हिने खात्यातील संपूर्ण रक्कम बँकेतून काढून घेतली व मृतकाचे बँकेतील खातेबंद करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाआरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणी मृतकाची वृद्ध आई यांच्या वतीने त्यांचा दुसरा मुलगा डॉ. मदन शंकर जुनघरे यांनी दिनांक १७ जुलै २०२६ रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अपराध क्र. ०३०८/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६८ सह कलम ३४ नुसार उज्ज्वला संतोष जुनघरे, रा. अंचळ, व इतर नातेवाईक राहणार नेतनसा विनोद गणपत बाजाड, रा . भारत साहेबराव बाजाड व लोमेश पंढरी बाजाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत आहेत.फिर्यादीनुसार, वारसाहक्काशी संबंधित प्रकरणात खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर करण्यात आला असून, त्याद्वारे कायदेशीर वारसांचा हक्क डावलून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणातील कागदपत्रांची सत्यता, आर्थिक व्यवहार तसेच वारसाहक्काशी संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी पोलीस करीत असून, तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान, या गुन्ह्याची नोंद झाल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, वृद्ध आईच्या वारसाहक्काच्या रकमेवर डल्ला मारल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
