प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हीराजा येथे सफाई कर्मचारी नियुक्ती कराकचरू झोंबाडे

प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हीराजा येथे सफाई कर्मचारी नियुक्ती करा.कचरू झोंबाडे

वाशीम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांना निवेदन देऊन किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सफाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी नियुक्त असलेले सफाई कर्मचारी रवी राजू मलिक यांना 2013 पासून प्रति नियुक्तीवर वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. तेव्हापासून येथे सफाई कर्मचारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये स्वच्छता ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हीराजा पुन्हा येथे नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते कचरू केशव झोंबाडे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *