आ.भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक संपन्न

आ.भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक संपन्न

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव नगरपंचायत सभागृहामध्ये मा नेत्यां आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या आदेशानुसार नगरपंचायत मालेगाव शहरातील आढावा सभा पार पडली. ताईसाहेबांनीं झालेल्या विकासकामे. शहरातील अत्यावश्यक असलेल्या बाबी.आरोग्य.स्वच्छता.साफसफाई धोकादायक विद्युत वाहक तारा. घाण पाण्याचे साचतअसलेले डबके.यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्य पाणी पूरवठा पाईप लाईनच कामाचा आढावा घेतला.शहरातील अपघात प्रवण स्थळावर रस्ते मोकळे करून मार्ग काढण्याच्या सुचना दिल्या. मच्छी मार्केट मटन मार्केट करिता स्वतंत्र जागा देण्याच्या सूचना दिल्या.तसेच नगरपंचायत करिता स्वतंत्र रुग्णवाहीका.शववाहीका.आणी मालेगाव स्म्शान भूमीत विदयुतशवदाहिनी. नवीन कब्रस्तान करिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या..त्यानंतर शहरातील अनेक जागे संदर्भातील प्लॉट संदर्भातील आणि अडचणी दूर केल्या. त्यानंतर प्रस्तावित कामांची माहिती आ.भावनाताई गवळी यांनी दिली त्यामध्ये मुख्यत्वे करून अकोला फाटा ते शेलु फाटा ते नागरतास उड्डाणपुलापर्यंत दुभाजक. पादचारी व्यवस्था. विद्युत व्यवस्था. शहरात भूमिगत गटर मलनिस्सारनयोजना पुढील वर्षात मंजुरात मिळून घेऊ असे सांगितले. कार्यक्रमास नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती लाभली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *