वारकरी धर्म परिषदेच्या लढ्याला मोठे यशआषाढी वारीसाठी आता १० ऐवजी २३ दिवस टोल टॅक्समुक्त प्रवासदेशोन्नती वृत्त संकलन

वारकरी धर्म परिषदेच्या लढ्याला मोठे यशआषाढी वारीसाठी आता १० ऐवजी २३ दिवस टोल टॅक्समुक्त प्रवासदेशोन्नती वृत्त संकलन

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

पवारकरी धर्म परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, आषाढी वारीसाठी यंदा १० दिवसांऐवजी तब्बल २३ दिवस टोल टॅक्समुक्त पास देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.दरवर्षी आषाढी वारीदरम्यान शासनाकडून केवळ १० दिवसांची टोलमाफी दिली जात होती. मात्र, या सवलतीचा लाभ सर्व वारकऱ्यांना मिळत नसल्याने वारकरी धर्म परिषदेने ही मुदत किमान २० ते २५ दिवस करण्याची मागणी केली होती.या मागणीसाठी वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. विलास महाराज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष प्रकाश घोंगटे, संजय फाटे, योगेश कोकाटे, ज्ञानदेव भांबेरे, कृष्णा जवंजाळ, अविनाश कुटे आदी पदाधिकाऱ्यांनी शासनाला निवेदन दिले होते. सात दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.या मागणीची दखल घेत शासनाने आषाढी वारीसाठी टोल टॅक्समुक्त पासची मुदत १० दिवसांवरून २३ दिवसांपर्यंत वाढवली आहे.या निर्णयाचा लाभ सर्व वारकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महाराज शास्त्री तसेच राष्ट्रीय महासचिव ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *