इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या विदर्भ अध्यक्षपदी विलासजी महाराज वाघमारे यांची नियुक्ती

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या विदर्भ अध्यक्षपदी विलासजी महाराज वाघमारे यांची नियुक्ती

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

वारकरी धर्म परिषद, विदर्भचे अध्यक्ष तथा समाजसेवक आदरणीय विलासजी महाराज वाघमारे यांची इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या विदर्भ अध्यक्षपदी दिल्ली येथून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे वारकरी संप्रदायासह सामाजिक, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजहित, मानवाधिकार संरक्षण आणि जनसेवेच्या कार्यात त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.त्यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल विविध संस्था, पदाधिकारी, मित्रपरिवार व शुभेच्छुकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *