महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष निम्मित “माझे गाव आरोग्य संपन्न

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष निम्मित “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अंतर्गत जामोद येथे सक्षम महिला शेतकरी गट व ग्राम पंचायत जामोद कडून भव्य आरोग्य शिबिर संपन्न

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निम्मित “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अंतर्गत जामोद येथे सक्षम महिला शेतकरी गट, ग्राम पंचायत जामोद व गोदावरी फाऊंडेशन, जळगांव खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये १५० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये डोळे, नाक कान घसा, हृदय रोग, अस्ति रोग, चर्म रोग इत्यादी विभागाचे तपासणी करण्यात आली. सदर शिबिराच्या अध्यक्ष स्थानी जामोद येथील लोकनियुक्त सरपंच सौ. गंगुबाई दामधर, उद्घाटक गोदावरी फाऊंडेशन चे डॉ. सिद्धेश्वर व महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समिती चे महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष राजीव घुटे तर प्रमुख उपस्थिती म्हणून समाधान दामधर, सक्षम महिला शेतकरी गटाच्या अध्यक्ष आशा बोडखे, सचिव संगीता दलाल, ग्राम विकास अधिकारी तुळशीराम चौधरी, जामोद प्राथमिक आरोग्य केंद्र चे डॉ. पुंडकर, डॉ. देशमुख, शेगोकर साहेब, ब्रम्हदेव घाटे व गोदावरी फाऊंडेशन चे सर्व संबंधित विभागाचे डॉक्टर उपस्थितीत होते.सदर शिबिरामध्ये विविध रोगांच्या तपासणी करून ज्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रिया करिता २१ जुलै रोजी गोदावरी फाऊंडेशन कडून मोफत बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आयुष्यमान कार्ड सोबत घ्यावे, सर्व उपचार व शस्त्रक्रिया गोदावरी फाऊंडेशन जळगांव येथे निःशुल्क करण्यात येतील.सदर शिबिराच्या यशस्वी आयोजना करिता सक्षम महिला शेतकरी गट, ग्राम पंचायत जामोद, प्राथमिक आरोग्य केंद्र, जामोद व महात्मा फुले द्विशताब्दी समिती यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *