
वाशिम जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ 5 वर्षांपासून रखडले; स्वराज्य पक्षाकडून CEO ना तात्काळ कार्यवाहीची मागणी
करोडोचा निधी खर्च होऊनही गावे तहानलेली; जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर चौकशी करा स्वराज्य राज्य सदस्य गोपाल भिसडे यांची मागणी*वाशिम – जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू झालेली पिण्याच्या पाण्याची योजना गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाल भिसडे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांना निवेदन देऊन रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे.दि. 16 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात भिसडे पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर होऊनही ती अर्धवट अवस्थेत आहेत. विशेषतः पाण्याच्या टाक्यांचे काम गेल्या 3-4 वर्षांपासून सुरूच आहे. आजतागायत योजनेची सद्यस्थिती, झालेला खर्च आणि काम पूर्ण होण्याची मुदत याबाबत नागरिकांना कोणतीही लेखी माहिती देण्यात आलेली नाही.*नागरिक त्रस्त, निधी वाया* वारंवार स्थानिक प्रशासनाकडे लेखी व तोंडी मागणी करूनही कामाला गती मिळालेली नाही. काम अर्धवट असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधीही वाया जात आहे. उन्हाळ्याच्या काळात परिस्थिती अधिक बिकट होते. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.*चार प्रमुख मागण्या* या संदर्भात गोपाल भिसडे पाटील यांनी CEO यांच्याकडे खालील मागण्या केल्या आहेत: 1. *जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी* वाशिम जिल्ह्यातील रखडलेल्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करावी. 2. *काम का रखडले* याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. 3. *रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून* नागरिकांना न्याय द्यावा. 4. *कामात भ्रष्टाचार आढळल्यास* कायदेशीर कार्यवाही करावी.निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर प्रकरणी तातडीने लक्ष घालून वाशिम जिल्ह्यातील जनतेचा पाणीप्रश्न मार्गी लावावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
