बोगस बियाणे कंपन्यावर तात्काळ कार्रवाई करुन शेतकऱ्याना मदत करा.

बोगस बियाणे कंपन्यावर तात्काळ कार्रवाई करुन शेतकऱ्याना मदत करा.

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनचे बोगस बियाणे असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी आज तालुक्यातील शेतकऱ्यासह जळगाव जामोद कृषि विभागाला भेट देऊन कृषि अधिकारी

यांच्यासोबत शेतकऱ्याच्या तक्रारी संदर्भात सविस्तर चर्चा केली. कृषि सहाय्यक पंचनाम्या मध्ये शेतकऱ्याची फसवणुक करीत असल्याची तक्रार यावेळी उपस्थित शेतकऱ्यानी केली असता प्रसेनजीत पाटिल यांनी त्या संबधी कृषि अधिकार्याला जाब विचारला. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, रवी (उन्नती ), हुतुतु, यांच्यासह शेतकऱ्याची तक्रारी असल्याचे सोयाबीन बियाणे कंपनी योग्य कार्यवाही साठी पाठपुरावा करन्याचे आश्वासन कृषि अधिकारी रमेश जाधव साहेब यांनी यावेळी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *