
जळगाव जामोद शहर व १४० गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा १३ ते १९ जुलैपर्यंत बंद
जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद शहर व परिसरातील १४० गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा दि. १३ जुलै २०२६ ते दि. १९ जुलै २०२६ या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.योजनेअंतर्गत आवश्यक दुरुस्ती, देखभाल व तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे या कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरासह सर्व संबंधित गावांतील नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत प्रशासनास सहकार्य करावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
