तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीमध्ये रॅम बसवण्यात यावी

तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीमध्ये रॅम बसवण्यात यावी

जळगाव जामोद द तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे नव्याने झालेल्या इमारतीमध्ये शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाला दिव्यांग बांधवांना चढण्या उतरण्याकरिता रॅम बसवणे चा शासन निर्णय आहे . त्या अंतर्गत तहसील कार्यालयाला रॅम ची अत्यंत आवश्यकता आहे. तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार कार्यालय असल्याकारणाने तेथे दिवसातून अनेक वृद्ध, दिव्यांग व्यक्ती येत असतात त्यामुळे त्यांना चढण्या उतरण्याकरिता अतोनात त्रास होतो अशा सर्व लोकांना चढण्या उतरण्या सुलभ मार्ग म्हणून शासन निर्णयानुसार रॅम तयार करून द्यावे. असे आज जळगाव जामोद येथील दिव्यांग प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी तालुकाध्यक्ष श्री नारायण महाले, सरदार अवासे, श्रीरंग बहादुरे, राजेश अवासे, छगन वास्कले, मोतीराम चंगळ, दिगंबर अविनाशे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *