
टिप्पर आणि कारची समोरासमोर धडक!# दोघा जणाचा जागीच मृत्यू , कुपटा – मानोरा रोड वरील घटना
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मानोरा येथील विदर्भ कलेक्शनचे मालक सुफियान कादर लंघा ( वय २४ वर्ष ) व शेख इम्रान शेख जमिर ( वय ३४ वर्ष ) हे दोघेही सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या कारने दि. ४ जुलै रोजी कारंजाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने कुपटा घाटा नंतर टर्निंग पॉईंटवर समोरासमोर धडक दिल्याने दोघेही ठार झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की, मानोरा येथील व्यापारी सुफियान कादर लंघा आणि शेख इम्रान शेख जमिर शेख हे दोघे आपल्या एम एच – ३२ ए एस ५८५८ या कारने अमरावती येथे जात असताना कुपटा गावाजवळील टर्निंग मध्ये टिप्पर व गाडीचा अपघात झाला. या अपघातात कारचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या अपघातात शेख इमरान शेख जमिर हा जागीच ठार झाला तर जखमी सुफियान कादर लंघा यास ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.# मृतक सुफीयानचे लग्न दोन वर्षापूर्वी झाले असुन त्याला एक १५ महिन्याची मुलगी आहे. तर शेख इम्रानचे लग्न सहा महिन्यापूर्वी पार पडले आहे. दोन युवा व्यापारी तरुणांचा अपघातात निधन झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
