शिष्यवृत्ती परीक्षेत निधी रेवस्कार बुलढाणा जिल्ह्यात प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत निधी रेवस्कार बुलढाणा जिल्ह्यात प्रथम

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

खामगाव, दि. ३ जुलै : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) २०२५-२६ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. या गुणवत्ता यादीमध्ये माधव विद्या मंदिर, जळगाव जामोद येथील विद्यार्थिनी कु. निधी वैशाली रामदास रेवस्कार हिने शहरी गटातून बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.कु. निधी ही डिझायर कोचिंग क्लासेस, खामगाव येथील विद्यार्थिनी असून तिने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.यापूर्वीही निधीने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. RTSE (गणित प्रावीण्य परीक्षा) मध्ये तिने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तसेच BTS (भारत टॅलेंट सर्च) परीक्षा मध्ये जिल्ह्यात द्वितीय व राज्यात विसावा क्रमांक मिळविला आहे.निधीच्या या यशामुळे तिचे आई-वडील, शिक्षक, डिझायर कोचिंग क्लासेस तसेच जळगाव जामोद व खामगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *