
चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मनसेची मागणीभाजप महिला पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने चौकशी वर संशय?
चंद्रपूर प्रतिनिधी गौरव मेल
दि. ४ जुलै : -चंद्रपूर येथे घडलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप महिला आधाडीच्या पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने निष्पक्ष चौकशी होण्यास राजकीय दबाव येऊ शकतो त्यामुळे या प्रकरणी निष्पक्ष, सखोल व तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातूनकेली आहे, यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रगती भोसले, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, शहर अध्यक्ष पियुष धुपे, शुभांगी देवतळे इत्यादीची उपस्थिती होती.मनसेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना निवेदन सादर करून या प्रकरणात कोणत्याही राजकीय किंवा इतर दबावाला बळी न पडता पारदर्शक तपास करण्याची मागणी केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तपासात कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग अथवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. नवजात बालकांची विक्री हा अत्यंत गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणारा प्रकार असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचीही मागणीही करण्यात आली आहे.
