अ.भा.कैकाडी महा.राज्याची नूतन कार्यकारिणी जाहीर राज्यभरातील पदाधिकाऱ्याची निवड संस्थापक अध्यक्ष संजय मेडे यांनी केली जाहीर

अ.भा.कैकाडी महा.राज्याची नूतन कार्यकारिणी जाहीर! राज्यभरातील पदाधिकाऱ्याची निवड( संस्थापक अध्यक्ष संजय मेडे यांनी केली जाहीर )

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

अखिल भारतीय कैकाडी महासंघ महाराष्ट्रच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून राज्यातील विविध विभाग व जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. संजयजी मेढे यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत दिगंबर काशिनाथ जाधव यांची राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्य सरचिटणीसपदी शरद माने, प्रा. कैलास जाधव, किसनराव जाधव व गोरख माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य उपनेते म्हणून अमोल माने व रवी जाधव यांची निवड करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी दादासाहेब फुलारी, बी. एम. माने, सोमनाथ पवार, मोहन जाधव, विश्वास माने, अनिल जाधव व खंडेराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य सचिवपदी सुधाकर जाधव, काशिनाथ जाधव व शेखर जाधव, तर राज्य सहसचिवपदी नवनाथ जाधव व गोविंद उंडाडे यांची निवड झाली आहे. राज्य संघटक म्हणून प्रा. विनोद जाधव, सायबा पवार व संजय बाबा गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच महिलाआघाडीच्या कार्यकारिणीत श्रीमती शैलजा जाधव महाराष्ट्र पश्चिम विभाग सांगली, व सौ. मायाताई जाधव (कुंचेकोरके) यांची मुंबई विभाग,महिला राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. महिला राज्य उपाध्यक्षपदी सौ. संगिताताई माने, पश्चिम महाराष्ट्र रायगड पुणे विभाग, सौ. उषा अनिल जाधव विदर्भ विभाग वाशिम,सौ. हुसेनम्मा लिंग्या नासरी नवी मुंबई,यांची नियुक्ती झाली आहे.तसेच महिला राज्य सचिवपदी श्रीमती. विद्याताई जाधव मराठवाडा विभाग (जालना) सौ. रेखाताई माने पश्चिम महाराष्ट्र सांगली,यांची निवड करण्यात आली असून या सर्वांचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्य मार्गदर्शक म्हणून मद्रीकार्जुन माने साहेब, बाबा जाधव साहेब, प्रा. बाळासाहेब माने व जनेश्वर नाथा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सल्लागार म्हणून लक्ष्मण माने, मानासिंग जाधव, रमेश गायकवाड व भरत जाधव यांची निवड करण्यात आली.यावेळी महासंघाच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर संघटितपणे काम करून कैकाडी समाजाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नूतन कार्यकारिणीचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार असल्याचे महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *