विविध स्पर्धा परीक्षांत कु. निधी रेवस्कार हिची उत्तुंग भरारी

विविध स्पर्धा परीक्षांत कु. निधी रेवस्कार हिची उत्तुंग भरारी

जळगाव जामोद, प्रतिनिधी :

तालुक्यातील कु. निधी रामदास रेवस्कार हिने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा व गुणवत्ता चाचण्यांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून जळगाव जामोद तालुका व बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.ती माधव विद्या मंदिर शाळेची विध्यार्थिनी आहे तसेच तिने डिझायर कोचिंग क्लासेस खामगांव येथे विविध स्पर्धा परीक्षाची पूर्व तयारी केली असून नुकताच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा (JNVST) 2026 मध्ये कु.निधी रेवस्कार हिने बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून PM SHRI जवाहर नवोदय विद्यालय,चिंचोली शेगांव येथे प्रवेशासाठी निवड निश्चित केली आहे.तसेच RTSE 2026 (राज्यस्तरीय बुद्धिमत्ता शोध परीक्षा) मध्ये तिने राज्य प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे.त्याचं बरोबर PUP शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये तिची गोल्डन कॅटेगरी मध्ये निवड झाली असून गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत 2025-26 मध्येही ती गोल्डन कॅटेगरीत राज्यात स्थान पटकावण्यात यशस्वी ठरली आहे.याशिवाय Dnyanodaya English Grammar Exam 2026 मध्ये तिने बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.अल्पवयात मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.कु.निधी रेवस्कार हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल शैक्षणिक,सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणारी कु. निधी रामदास रेवस्कार (जळगाव जामोद, जि. बुलढाणा).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *