
तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव जामोद प्रतिनिधी
घटना मालेगाव बाजार येथील आरामशीन परिसरातील तरुणावर लोखंडी पाइपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेत तरुण गंभीर जखमी प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, माहितीनुसार,जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम खेर्डा येथील अंकुश बाळकृष्ण खरात हा गुरांच्या चाऱ्यासाठी गेला होता.रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने त्याचा भाऊ अर्जुन खरात व नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. दरम्यान माळेगाव रोडवरील आरामशीन परिसरात त्यांनी अंकुशला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले. तेथे प्रदीप राजाराम कोकरे व सीमा राजाराम कोकरे हे दोघे त्याला पाइपने मारहाण करत असल्याचे दिसून आले.हल्लेखोरांनी यांना पाहताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या मारहाणीत अंकुशच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली जखमीला तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले, अकोला तेथील डॉकटरांनी प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी संभाजी नगर येथील मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, घटनेची फिर्याद अर्जुन खरात राहणार खेर्डा, तालुका जळगाव जा यांनी तेल्हारा पोलिसात लेखी फिर्याद दिली फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरून तेल्हारा पोलीस स्टेशला आरोपी प्रदीप कोकरे व त्याची पत्नी सीमा प्रदीप कोकरे यांचे विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS )चे कलम 118,(1)व 3,(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीस अटक केली असून दुसरा आरोपी महिला ही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे,
