माळी वेटाळात य संत गजानन महाराज मंदिर कलशारोहन सोहळा संपन्न

माळी वेटाळात य संत गजानन महाराज मंदिर कलशारोहन सोहळा संपन्न

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शहरातील माळी वेटाळ परिसरात आयोजित संत शिरोमणी गजानन महाराज मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. धार्मिक उत्साह, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात हा पवित्र सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.विविध मान्यवर, मंदिर समिती सदस्य, पदाधिकारी तसेच भाविक भक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. यावेळी श्रींचे दर्शन घेऊन उपस्थितांशी स्नेहसंवाद साधण्यात आला. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गजानन महाराजांच्या नामस्मरणाने तसेच भजन-कीर्तनांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.


या पवित्र कलशारोहन सोहळ्यामुळे परिसरात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. भाविकांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची भावना आणि भक्तीचा उत्साह मनाला स्पर्श करून गेला. श्री गजानन महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना श्री चरणी करण्यात आली
.दरम्यान, दुपारी ४ वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १० ते १५ क्विंटल महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेत धार्मिक सोहळ्याचा आनंद अनुभवला. संपूर्ण कार्यक्रम शांतता, शिस्त आणि भक्तिभावात पार पडल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *