छत्रपती संभाजी हे महापराक्रमी योध्दाच नव्हे तर असामान्य विचारवंत देखील होते प्रा‌ आव्हाळे

छत्रपती संभाजी हे महापराक्रमी योध्दाच नव्हे तर असामान्य विचारवंत देखील होते. प्रा‌ आव्हाळे

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी योद्धा तर होतेच परंतु असामान्य बुद्धीचे विचारवंत देखील होते. असे उद्गार प्रा. भरत आव्हाळे यांनी काढले. ते आपल्या भाषणात पूढे म.हणाले कु, त्यांनी अवघ्या 14 व्या वर्षी संस्कृत मधील सर्वोत्कृष्ट दर्जाचे चार ग्रंथ लिहून ते सिध्द केले . तसेच अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी शेकडो लढाया लढुन त्या जिंकल्या देखील . परंतू अशा या महा कर्तृत्ववान योद्याला काही तथाकथित ईतीहासकारांनी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे विचार मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक प्रा भरत आव्हाळे यांनी राजे संभाजी यांच्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या वतीने 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी प्राचार्य वसंत अवचार होते . तसेच विभागीय सचिव प्रा अनंत गायकवाड, विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण पाटील , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड . शंकरराव मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. शंभुराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून त्यांच्या कार्याला या वेळी मान्यवरांनी उजाळा दिला . संभाजी राजांना काही ईतिहासकारांनी जाणीवपुर्वक कुठलाही पुरावा नसतांना बदफैली , स्त्रीलंपट , व्यसनाधीन दाखवुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता .

मात्र नव्या पिढीच्या ईतिहास संशोधकांनी तत्कालीन पुराव्यानिशी महाराजांचे खरे कार्य शोधुन त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले . त्यामुळेच शंभुराजे आज घराघरात पोहचले . असे प्राचार्य वसंतराव अवचार यांनी सांगीतले . यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष कामिनी अवचार, छाया जाधव, शेषराव जाधव , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तेजराव पाटील जाधव, सचिव अशोक जाधव, प्राचार्य अनिल गवळी, नागेश कव्हर ,दिनकर पोफळे ,प्रशांत वाझुळकर, बाबुराव सदार, मंगल बांडे , नंदकिशोर नवघरे, मनोज वाझुळकर, जिवन टिकाईत , प्रदीप खिल्लारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *