युवा आंदोलक तथागत भाई आंभोरे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल संग्रामपूर तालुक्यत जल्लोष

युवा आंदोलक तथागत भाई आंभोरे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार ’ मिळाल्या बद्दल संग्रामपूर तालुक्यत जल्लोष

प्रतिनिधी संग्रामपूर तालुका

लोकशाही अण्णाभाऊ साठे आडिटोरियन येरवडा पुणे दी. 14 मे 2026 रोजि तथागत भाई आंभोरे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार अविनाश सुकु़ंडे साहेब याच्या हस्ते मिळाला उपस्थित तृप्ती देसाही पुणे महापलीका अध्यक्ष हे सर्व उपस्थित होते संग्रामपूर 14 मे २०२६ संग्रामपूर तालुक्यातील दबंग, डॅशिंग आणि निर्भीड युवा आंदोलक म्हणून ओळखले जाणारे तथागत भाई आंभोरे यांना महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ‘युवा फाउंडेशन महाराष्ट्र गौरव पुरस्कार ’ मिळाल्या झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण बद्दल सर्व संग्रामपूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यात आनंदी आनंद निर्माण झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सामान्य जनतेच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे तथागत भाई आंभोरे यांनी अनेक वेळा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता त्यांनी सामाजिक प्रश्नांवर लढा उभारला. त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे आणि थेट भूमिका मांडण्याच्या शैलीमुळे ते युवा वर्गात विशेष लोकप्रिय झाले आहेत.विशेष म्हणजे, अन्यायाविरुद्ध केवळ आंदोलनच नव्हे तर आपल्या प्रभावी लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या लिखाणामुळे समाजातील अनेक मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, त्यांच्या लेखणीला एक प्रकारची लढाऊ ओळख प्राप्त झाली आहे.तथागत भाई आंभोरे यांना मिळालेला ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ हा केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून, तो प्रत्येक सामान्य माणसाच्या संघर्षाचा आणि आवाजाचा सन्मान मानला जात आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.या सन्मानाबद्दल बोलताना अनेक मान्यवरांनी सांगितले की, “तथागत भाई आंभोरे यांची समाजासाठीची तळमळ, निडर भूमिका आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची तयारी ही आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा हा सन्मान खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला मिळालेला आहे.”तथागत भाई आंभोरे यांनी देखील सर्वांचे आभार मानत पुढील काळात अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे समाजासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.एकूणच, संग्रामपूर तालुक्याच्या मातीतून घडलेल्या या युवा आंदोलकाच्या यशामुळे संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *