
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन
प्रतिनिधी जळगांव जामोद
स्थानिक सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद संचालित कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ACE ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड, फरीदाबाद (हरियाणा) या बहुराष्ट्रिय कंपनीद्वारे महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन दि.06/05/2026 रोजी करण्यात आले होते.तांत्रिक आणि व्यक्तिगत मुलाखतीसाठी महाविद्यालयातील एकूण 41 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अंतिम निकालानंतर कंपनीतर्फे 29 विद्यार्थ्यांची सेल्स इंजिनियर या पदासाठी निवड करण्यात

आली.विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रिय कंपन्यांच्या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना घडविल्या जात आहे व अशा प्रकारे कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील अनेक संधी भविष्यात निर्माण होतील अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राहुल तायडे यांनी दिली. महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्यासाठी सतत प्रोत्साहित करण्यात येते.अशाप्रकारे बहुविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातर्फे राबवण्यात येतात यामुळेच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच फायदा होत आहे, असे मनोगत कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.कॅम्पस प्लेसमेंटसाठी कंपनीतर्फे बिझनेस हेड श्री.रविंद्र खानेजा, मार्केटिंग हेड श्री.प्रेम चंद, रिजनल मॅनेजर श्री.पंकज तसेच विद्यापीठाकडून समन्वयक म्हणून डॉ.रोहित तांबे आणि महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी उपस्थित होते.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे, उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब इंगळे, कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नितीन सातव व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
