
आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा वर्ग १२ वीचा उत्कृष्ट निकाल
वरोरा जिल्हा प्रतिनिधी
वरोरा तालुक्यातील आनंदवन, वरोरा येथील आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.महाविद्यालयाचा एकूण निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विज्ञान शाखेचा निकाल ९५.६८%, कला शाखेचा ८७.९६% तर वाणिज्य शाखेचा ८६.१९% इतका लागला आहे. या निकालातून विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण यांचे उत्तम संयोजन स्पष्टपणे दिसून येते.विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरीविज्ञान शाखेमध्ये तन्मय अरविंद सातपुते (८६.८३%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

त्यापाठोपाठ प्रितम यशवंत राऊत (८४.३३%) व तन्मय संतोष ताडूरवार (८०.६७%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. दिशांत रुपेश तुरे (८०.१७%), रिया संजय लेडांगे (७९.५०%), संबोधी देवानंद अलोने (७९.१७%), अंजली प्रमोद चरडे (७७.६७%) आणि धनश्री प्रमोद नौकरकर (७६.५०%) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण मिळवून प्राविण्य यादीत स्थान मिळवले.वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) मध्ये उज्वल यश प्राप्त झाले आहे.वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमातून कु. गुंजन प्रेमकुमार ओझा (७९.५०%) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विनायक गजानन कोटुरवार (७७.६७%) आणि कु. सिद्धि सुरज गड्डमवार (७६.८३%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. याशिवाय सुहानी भगत, ऋतुजा फुकट, ऋतुजा जांबुळे, प्रार्थना पिसे आदी विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) मध्येही चांगली कामगिरी केली आहे.मराठी माध्यमातून सुरज संजय फुलारे (७९.५०%) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सुहाग बालकृष्ण चौधरी (७४.३३%) आणि रजनी अनिल डांगे (७२.६७%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवत शाखेचा मान उंचावला.कला शाखेतही विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय कामगिरी केली आहे.कला शाखेत कु. भारती निलू नन्नावरे (७५.१७%) आणि कु. ऋतुजा सुधीर नन्नावरे (७३.३३%) यांनी प्राविण्य मिळवत शाखेची शान वाढवली.या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर तसेच पर्यवेक्षक प्रा. अनिल तरोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत, याचप्रमाणे कठोर परिश्रम व जिद्दीने पुढेही यश मिळवत राहण्याचा सल्ला दिला.महाविद्यालयाच्या या उज्वल निकालामुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट झाली असून भविष्यातही असेच यश मिळवण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
