पिक विमा कंपनीकडून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक विवेक गवळी यांचा संताप नुकसान भरपाईची मागणी

पिक विमा कंपनीकडून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक विवेक गवळी यांचा संताप, नुकसान भरपाईची मागणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीने सरळसरळ फसवणूक केली असून, पिकांचे अतोनात नुकसान होऊनही विम्याची रक्कम नाकारली आहे. त्यामुळे पिक विमा ‘कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत,’ असा खळबळजनक आरोप अमानी येथील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते विवेक बबनराव गवळी यांनी केला आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत त्यांनी याप्रकरणी शासनाने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात केवळ करंजी महसूल मंडळ वगळता इतर सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, याची दखल घेत खुद्द शासनाने शेतकऱ्यांना ‘अतिवृष्टी मदत’ जाहीर केली आहे. शासनाचे हे नुकसानीचे निकष समोर असतानाही पिक विमा कंपनीने मात्र तांत्रिक कारणे पुढे करत विमा नाकारला आहे.अडचणीत वाढ झाली असून? अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत विमा कंपनीचा आधार मिळणे अपेक्षित असताना, कंपनीने अन्यायकारक भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.? ‘शासनाने अतिवृष्टीची मदत दिली, याचाच अर्थ पिकांचे नुकसान झाले आहे हे सिद्ध होते. मग विमा कंपनी विमा देण्यास टाळाटाळ का करत

आहे? हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. विमा कंपनीने तात्काळ विम्याची रक्कम अदा करावी मागणी विवेक बबनराव गवळी यांनी केली आहे तर ? या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विवेक गवळी यांनी आमदार भावनाताई गवळी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयात मध्यस्थी करून विमा कंपनीला धारेवर धरावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *