
उत्कृष्ट कामगिरी बद्दल दोन्ही मार्शल अंमलदार यांचा पोलीस स्टेशन मध्ये सत्कार
ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर तायडे
आज 27/04/2026 रोजी चंदननगर पोलीस स्टेशन येथे कार्य करत असलेले पोलीस अंमलदार 2817 तलवारे व *पोलीस अंमलदार 779 सतीश कतारी* महात्मा फुले मार्शल दिवसपाळी कर्तव्यावर असताना सायंकाळी 19/08 वाजता एम.डी.टी मशीन वर #CFS36230850 द्वारे Suicide Attempt चा कॉल प्राप्त झाला, मार्शल यांनी तात्काळ कॉलर सोबत कॉन्टॅक्ट केले असता ते घरी नसून त्यांचे वडील दरवाजा आतून बंद करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगितले, त्यावर मार्शल कॉलर यांनी दिलेल्या पत्यावर जाऊन वेल्डरला तात्काळ घटना स्थळावर बोलाऊन घेतले व बंद दरवाजा उघडला असता कॉलर यांचे वडील गळफास लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते , दोन्ही मार्शलने लगेचच त्यांना खाली उतरवून बेड वरती बसवलं, व त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचाराकामी पाठवले, व प्राथमिक उपचारानंतर त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले असता आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे…. वरील प्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन्ही मार्शल अंमलदार यांचा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा श्री निलेश बडाख साहेब यांच्याकडून दोन्ही अंमलदार पुष्पगुच्छ व श्रीफळ सत्कार करण्यात आला तसेच आपण चांगली कामगिरी बजावली यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा श्री निलेश बडाख यांनी दोघांना पण शुभेच्छा दिल्या
