
किन्हिराजा वाशीम मार्गावर मजुराकडून वाढत्या तापमानातही काम करून घेतले जात आहे
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव )
तालुक्यातील किन्हिराजा वाशीम के किन्हिराजा या रोडच्या भर उन्हात मजुराकरवी काम करू घेतल्या जात असल्याने या उष्णतेच्या लाटेचा या कामगारांनाही फटका बसत असून अनेक शासकीय व निमशासकीय ठेकेदाराकडून भर उन्हात मजूराकडून काम करून घेत असल्याचे दीसून येत आहे. शासनाकडून वारंवार सूचना देवुन ही शासकीय कंत्राटदार, व खाजगी ठेकेदार हे मजूराकडून भर उन्हात काम तरूण घेत आहेत एकीकडे उन्हाचा पारा हा ४० च्या पार गेला असून उन्हाचे चटके बसत आहेत. सावलीतही जीवाची लाही लाही हेच असताना हे नीद्रयी ठेकेदार भर उन्हात मजूराकडून काम करू घेत आहे. रात्री ला लाईट लावुन रोडचे काम करणारे ठेकेदाराने कमीत कमी मजूराकडून दुपारी १२ ते ४ च्या नंतरच उन कमी झाल्यावर रोडवरील चुना मारण्याची कामे करून घ्यायला पाहीजेत परंतू भर उन्हात मजूराकडून या रोडवर चुना मारण्याची व इतरही कामे करून घेत आहेत दुसरीकडे सोलर प्लॅन्टवर वीजेची जोडणी करण्यासाठी आलेले कामगारा कडूनही भर उन्हात तार ओढणे, झाडे तोडणे, पोल उभे करण्याचे कामे करण्यात येत आहे. किन्हिराजा वाशीम रोडवरील मुजूराचे व वीजेचे कार पोल लावणाऱ्यामजुरांची संबंधित ठेकेदार हे पीळवणूक करित असून उन्हाच्या लाटेतही त्यांचेकडून भर उन्हात अवजड कामे करून घेत आहेत, त्यामूळे या मजुरांना उष्माघाताचा फटका बसण्याची व वेळप्रसंगी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित दोन्ही ठेकेदारावर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
