वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी नितेश खाटमोडे

वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी नितेश खाटमोडे

मालेगांव जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३० एप्रिल २०२६ रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार वाशिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाबाबत झालेली महत्त्वाची फेरबदल चर्चेचा विषय ठरली असून, जिल्ह्याची धुरा आता आयपीएस नितेश खाटमोडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक नितेश खाटमोडे यांची आता वाशिमचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.वाशिमचे विद्यमान पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची बदली आता पुणे येथे करण्यात आली असून, ते नितेश खाटमोडे यांच्या जागी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमऐवी आता पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.#कोण आहेत नितेश खाटमोडे?एक शिस्तप्रिय आणि ‘ॲक्शन मोड’मध्ये राहणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नितेश खाटमोडे लवकरच वाशिमचा पदभार स्वीकारणार आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या तांत्रिक पार्श्वभूमीमुळे गुन्हे अन्वेषणात सायबर आणि डिजिटल पुराव्यांचा वापर करण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. नक्षलविरोधी कारवाया आणि दुर्गम भागातील पोलीस यंत्रणा हाताळण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. अवैध धंदे आणि गुंडगिरीविरुद्ध ते कठोर भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.नितेश खाटमोडे यांच्या आगमनामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *