किरकोळ कारणावरून रॉडने हल्ला; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून रॉडने हल्ला; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

येथील शिरपूर फाटा परिसरात किरकोळ कारणावरून दोन जणांनी एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेश विश्वनाथ तारे वय ३५ वर्ष,व्यवसाय डॉक्टर,रा.जाट गल्ली,मालेगाव) हे आपल्या मित्रासोबत जेवण करून स्कुटीने घरी जात असताना २६ एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 च्या सुमारास शिरपूर फाटा येथे आरोपी अनिकेत रमेश शिंदे व विनय गजानन सौभागे दोन्ही रा.मालेगाव यांनी मोटरसायकलवर येऊन कोणतेही ठोस कारण नसताना फिर्यादीच्या मित्रावर लोखंडी रॉडने डोक्यावर वार करत मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीने स्कुटी पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पाठलाग करत स्कुटीला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर “जिवाने मारून टाका” अशी धमकी देत आरोपींनी पुन्हा रॉडने बेदम मारहाण केली या हल्ल्यात आशुतोष विष्णू कंकाळ रा.मालेगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर जखमी बेशुद्ध पडल्याने तो मरण पावल्याचे समजून आरोपी घटनास्थळावरून मोटरसायकलने पसार झाले. या घटनेची तक्रार उशिरा रात्री दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर चिंचोळकर हे अधिकारी राजेश खेरडे यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *