चीनचा दौरा आटोपुन मायदेशी परतल्या बद्दल गोपाल पाटील राऊत यांचा मराठा सेवा संघातर्फे सत्कार

चीनचा दौरा आटोपुन मायदेशी परतल्या बद्दल गोपाल पाटील राऊत यांचा मराठा सेवा संघातर्फे सत्कार

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

चीन या देशातील लोकांमधे असलेली शिस्त, श्रम करण्याची तयारी आणि चिकाटी या गुणामुळे या देशाने सर्वच क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. या देशाचे औद्योगिक क्षेत्र तर जगात प्रचंड शक्तिशाली असे बनले असून या देशात तयार झालेला माल जगातील सर्वच देशात अतिशय कमी किमतीमध्ये विकला जातो . या देशाने अतिशय कमी काळामध्ये केलेली औद्योगिक, वैद्यकिय , क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती ही डोळे दिपवणारी असुन या सर्वच बाबतीत आपला देश अजुन किमान ५० वर्ष तरी चीन च्या मागे असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील राऊत यांनी मालेगांव येथे बोलतांना व्यक्त केली . चीन या देशाचे औद्योगिक धोरण तसेच आयात निर्यात प्रक्रिया याबाबतीत चीन या देशाने शांघाय या शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या पाच दिवसीय शिबिरामध्ये मालेगाव येथील गोपाल पाटील राऊत सहभागी झाले होते . या शिबीरात महाराष्ट्रातील १०० व भारतातील किमान १००० आणि जगातील १ लाख व्यावसाईक सहभागी झाले होते . व्यावसायिक क्षेत्रात भरारी घेत असलेल्या गोपाल पाटील राऊत या युवा व्यावसायिकाने नुकताच चीनचा दौरा पुर्ण करून मायदेशात परत आले. त्यामुळे त्यांचा भावपूर्ण सत्कार मालेगाव तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने 28 एप्रिल रोजी मालेगाव येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश सदस्य माजी प्राचार्य वसंत अवचार हे होते. तसेच प्रदेश संघटक प्राध्यापक भरत आव्हाळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड शंकर मगर, विभागिय कार्याध्यक्ष प्रा प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोपाल पाटील राऊत यांचा सेवा संघाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ” शिवाजी कोण होता ” हे पुस्तक भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी चीन या देशातील त्यांच्या पाच दिवसाच्या दौऱ्यामध्ये अनुभव घेतलेली व त्या ठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनावरून उपस्थित मान्यवरांना चीन या देशाच्या प्रगती बद्दल अनेक आश्चर्यजनक बाबी कथन केल्या. चीन या देशातील लोकांचे असलेले देशाप्रती प्रेम व तळमळ ही आपल्या देशात बघायला मिळत नाही. असे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणूस हा व्यवसायामध्ये कोणत्याना कोणत्यातरी व्यवसायामध्ये गुंतलेला असून त्या ठिकाणची स्वच्छता , शिस्त तसेच रोबोटिक गुणवत्ता ही मनाला भावून जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या देशातील लोकांना जर चीनची बरोबरी करायची असेल तर आणखी किमान पन्नास वर्षे तरी वाट बघावी लागेल असे सांगितले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तेजराव पाटील जाधव, सचिव अशोक जाधव , साहेबराव कढणे, बबन सोनाळकर, दिनकर पोफळे, नंदकिशोर नवघरे ,भिकाजी पाटील शिंदे, मधु ओझा , माधव गायकवाड, बाबुराव सदार , प्राचार्य अनिल गवळी, जगन्नाथ रंजवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती . प्रा भरत आव्हाळे यांनी मे महीन्यात एक जिल्हा स्तरिय मराठा व्यावसाईकांचा मेळावा वाशिम येथे आयोजित करुन नव व्यावसाईकांना व्यवसायामध्ये प्रगती करण्यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येईल असे सांगीतले . प्राचार्य वसंत अवचार यांनी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *