जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात

जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात

वाशीम जिल्हा प्रतिनिधी,( अनिल जाधव)

स्थानिक मुंदडा विद्यालयात जनगणना २०२७ तीन दिवशीय विशेष प्रशिक्षण शिबिराला सुरवात झाली आहे. जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने हे विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. या जनगणना शिबिराचे उद्घाटन ना ना मुंदडा विद्यालयाचे प्राचार्य दिनेश उंटवाल हे होते तर प्रमुख उपस्थितीत नगर पंचायत चे उपमुख्यधिकारी इम्रान शेख हे होते प्रशिक्षणात मुख्य मार्गदर्शक म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्रा विनोद टेकाळे आणि आर ए कॉलेज वाशिम चे प्रा ज्ञानेश्वर ठाकरे हे होते .सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली प्रस्ताविक इम्रान शेख यांनी केले शिबिरात प्राचार्य दिनेश उंटवाल विनोद टेकाळे आणि ज्ञानेश्वर ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरात पहिल्या दिवशी तज्ञ मार्गदर्शक यांनी शिबिरात उत्कृष्ट माहिती सादर केली दरम्यान चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर पंचायत मालेगाव सतीश शेवदा यांनी भेट देऊन प्रशिक्षण तसेच जनगणना संदर्भात सूचना दिल्या . प्रशिक्षनात ३५ पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अमोल कल्याणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविकिरण काटेकर यांनी केले.चौकट *स्वगणना करन्याचे आवाहन* जनगणना २०२७ आता १ मे पासून सुरू होणार असून स्वगणना करणे आवश्यक आहे सर्व शासकीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षक यांनी स्वागणना स्वतः करून इतरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन न प उप मुख्याधिकारी इम्रान शेख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *