
भारतीय बौद्ध महासभेची आढाव बैठक संपन्न
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
स्थानिक तक्षशिला बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा मालेगाव तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विलास गुडदे व सरचिटणीस राहुल वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग संपन्न झाली. तालुक्यात कोणकोणते शिबिर राबवायचे तर शिबिर कोणत्या गावात ठेवायचे या बैठकीत चर्चा करून नियोजन करण्यात आले. या मध्ये महिला संस्कार शिबिर, बाल संस्कार शिबिर व भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या शाखेचे उदघाटन आणि मालेगाव येथे धम्म परिषद घेण्यासाठी चर्चा झाली. यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विलास गुडदे, सरचिटणीस राहुल वानखडे, शहर अध्यक्ष कैलास इंगळे, संस्कार प्रमुख विजय सोनुने, समता सैनिक संतोष तायडे, प्रभाकर तायडे, पत्रकार अजय चोथमल यांनी या शिबीरा बाबत चर्चा केली व लवकरच मालेगाव तालुक्यात महिला संस्कार शिबिर, बाल संस्कार शिबिर, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या शाखेचे उदघाटन तसेच मालेगाव येथे धम्म परिषदे होणार आहे. तसेच मालेगाव तालुक्यात गावागावात भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या शाखा सुरू करावयाच्या असेल किंवा महिला व पुरुष यांना समता सैनिक दल मध्ये सैनिक म्हणून काम करायचे असेल त्यांनी मालेगाव तालुकाध्यक्ष विलास गुडदे व सरचिटणीस राहुल वानखडे यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले.
