
जि ओ नेटवर्कचा बोजवारा ;ऑनलाईन कामात अडथळे,नागरिक, व्यापारी विद्यार्थी, शेतकरीवर्ग त्रस्त
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील मेडशी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून जिओ (Jio) कंपनीची मोबाइल सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात नेटवर्क अभावी रेशन दुकानातील ई-पॉस (e-POS) मशिन्स बंद पडल्याने धान्य वाटप प्रक्रिया पूर्णपणे अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, हातावर पोट असलेल्या मजुरांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही धान्य न घेताच घरी परतावे लागत आहे. तसेच डिजिटल व्यवहार ठप्प झाले असून, ऑनलाइन कामांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे.आजच्या काळात बहुतांश व्यवहार हे ‘यूपीआय’ (UPI) आणि ऑनलाइन बँकिंगवर अवलंबून आहेत. मात्र, मेडशीमध्ये जिओचे नेटवर्क कधी पूर्णपणे गायब होते, तर कधी रेंज असूनही इंटरनेट चालत नाही. यामुळे किराणा दुकाने आणि महा-ई-सेवा केंद्रांवरील कामांचा खोळंबा होत आहे. तासनतास रेंज नसल्यामुळे ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्याबरोबरच शालेय कामकाज, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास इतर ऑनलाईन अर्ज व शासकीय कर्मचाऱ्यांचे दैनंदिन रिपोर्टिंग नेटवर्कअभावी रखडत आहे. रेंज नसल्यामुळे कॉल ड्रॉपचे प्रमाण वाढले असून, महत्त्वाचे निरोप वेळेवर पोहोचत नाहीत.चौकट *टावरची क्षमता वाढवा.* “मेडशी हे महत्त्वाचे केंद्र असून येथे नेटवर्कची समस्या निर्माण होणे गंभीर आहे. कंपनीने तातडीने टॉवरची क्षमता वाढवून सेवा सुरळीत करावी.” -जावेद धन्नू भवानीवाले (सामाजिक कार्यकर्ते,मेडशी)
