
माजी आमदार विजयरावजी जाधव यांची मेळघाट भाजप प्रभारीपदी नियुक्ती
जिल्हा प्रतिनिधी वाशिम उमेश लहाने
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक फेररचनेत मेळघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अनुभवी नेते आणि माजी आमदार विजयरावजी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजप अमरावती ग्रामीणच्या वतीने या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मेळघाटमध्ये संघटना बळकट करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.विजयरावजी जाधव हे भाजपचे निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे असलेला दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक कामाचा अनुभव लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळघाट सारख्या दुर्गम भागात भाजपची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी जाधव यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.या निवडीचे वृत्त समजताच त्यांच्या रिसोड-मालेगाव मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेळघाटच्या विकासासाठी आणि पक्ष विस्तारासाठी आपण कटीबद्ध असल्याची भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केली आहे.
