
पि एम आवास,व रमाई आवास योजनेच्या अनुदानात भेदभाव का ?सामाजिक कार्यकर्ते जाधव यांचा सवाल
मालेगाव प्रतिनिधी (अनिल जाधव)
राज्य व केंद्रशासना कडून ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब जनतेला घरकुल योजनेचा लाभ देतांना , त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या अनुदानामध्ये भेदभाव का हसा सवाल सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी काढला, शासनाच्या वतीने पीएम आवास योजना तसेच रमाई आवास योजना या घरकुल योजनेसाठी पीएम आवास योजने जवळपास दोन लाखाचा निधी देण्याचे शासनाने ठरवले असता मात्र रमाई आवास योजनेत करिता दीड लाखापर्यंतचा अनुदान मिळत असल्याने यात ५० हजार रुपये चा दोघात फरक जाणवतो, हा भेदभाव कशासाठी तेव्हा सर्व घरकुलकरिता दोन लाखाचा निधी दिल्या गेला पाहिजे अशी मागणी जाधव यांनी केली आहे, जाधव यांनी मालेगाव पंचायत समिती अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी केली असता शासनाचा जीआर असल्याचे सांगून पीएम आवास योजनेसाठी वाढीव ५० हजार रुपये,यामध्ये बांधकामासाठी ३५ तर सोलर साठी १५ सोलर करिता मिळणार असल्याचे सांगतात, सन २०२४ -२५ या वर्षापासून ही योजनात अनुदानात वाढीव असणारा असून मालेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलाचे टार्गेट ३२२२/-असल्याचे कळते,तर शबरी आवासचे टारगेट २५० आहे,रमाई घरकुल करिता पहिली खिस्त १५ हजार रुपये टाकण्यात येते, दुसरी ख्रिस्त ४५ हजाराची,तिसरी ४० हजार व एमआरजीएस कडून २२०००/- आणि शौचालय साठी १२०००/-असे जवळपास एक लाख ४५ हजार रुपये दरम्यान मिळतात, मध्यंतरी शासनाच्या वतीने रेती करिता तसेच ज्यांना जागा उपलब्ध नाहीत त्यांना हे रक्कम देण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु अद्याप तरी या योजनेचा लाभ लोकांना भेटला नसल्याचे समजते, तसेच रमाई व पी एम आवास योजना ही एकच करून फक्त पीएम योजना सर्वांसाठी लागू असणार असल्याचे चर्चा असून यामध्ये रमाई योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे, अनुदान हे सर्वांसाठी सारखेच ठेवून प्रत्येकांना या घरकुला करिता कमीत कमी तीन लाख रुपये बांधकामासाठी देण्यात यावे आणि यामध्ये दोन टप्प्यातच रक्कम ही देण्यात आली पाहिजे अशी ही मागणी जाधव यांनी केली आहे
