
जांभरून वाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी आनंद जाधव
मालेगाव तालुक्यातील जांभरुणवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व तथागत गौतम बुद्ध तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून पुष्प वाहून पंचशील ध्वज फडकविण्यात आला व सर्व महामानवांना वंदन करण्यात आले. जयंती निमित्त गावातील कु. श्रुतिका रमेश कांबळे उच्चशिक्षित, ऋतिक विठ्ठल कांबळे आर्मी व सुनील गुलाब नांदे उच्चशिक्षित यांचं गावातील ज्येष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील लहान मुलांचा अभ्यासातील उत्साह वाढण्यासाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यामध्ये प्रा. रमेश लक्ष्मण कांबळे सर यांच्यातर्फे प्रथम द्वितीय व इतर असे शालेय वस्तू बक्षीस म्हणून वितरण केले तर संगीता तातेराव कांबळे यांनी काही मुलांना रजिस्टर वाटप केले. तर याआधी व नंतर जयंती निमित्त गावातील पो. पा. भगवान कांबळे, मा. उपसरपंच साईनाथ कांबळे, मा. सरपंच विश्वास कांबळे, मा. उपसरपंच सदस्य बाबुराव कांबळे, उज्वला खडसे, अभिमान उचित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान कांबळे, सरपंच कैलास ठेंगे व सर्व समाज बांधवांनी जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन पुष्प अर्पण केले असून नंतर दरवर्षीप्रमाणे गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सुद्धा सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
