
संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
शिरपूर जैन येथील कुंभार समाजाच्या वतीने संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात कुंभारवाडा येथे साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम समाजाचे वयोवृद्ध हरिभाऊ इंगळे यांच्या हस्ते गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन हार अर्पण करण्यात आला व नंतर सर्व समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून आरती केली. यावेळी समाजाचे हरिभाऊ इंगळे यांच्यासह देविदास इंगळे, विठोबा इंगळे, पुंडलिक इंगळे, संतोष इंगळे, महादू इंगळे, संतोष इंगळे, केशव इंगळे संतोष इंगळे मोतीराम इंगळे, विश्वास घोडे यांचे सह गावातील सामाजिक कार्यकर्ते श्याम दीक्षित उपस्थिती होती कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित त्यांना प्रसाद वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
