पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दनिमित्त दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मिरवणूक.तसेच भीम गीत कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम सकाळी साडे आठ वाजता. सूर्यभान खडसे ह्यांचे.हसते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कोंडीराम गुडदे ह्यांचे हस्ते.भगवान बुद्ध ह्यांचे प्रतिमेच पूजन तसेच नंदू खडसे ह्यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले ह्यांचे प्रतिमेच पूजन करून किसन ताजने ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून. रामदास वानखेडे ह्यांनी उपासक व उपासिका समवेत त्रिशरण पंचशील घेतले. त्या नंतर सकाळी दहा वाजता चे दरम्यान मिरवणुकीस सुरवात करण्या पूर्वी. मालेगाव पो. स्टेशन चे ठाणेदार मा. राजेश खेरडे साहेब ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून धम्म रथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.ह्या वेळी मुसळे साहेब.. काळे साहेब.शिवाजी काळदाते साहेब.लोंढे मॅडम .महादेव मुठाळ तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्या नंतर नियोजित मार्ग वरून मिरवणूक अतिशय शांततेत. पार पडली. रस्त्यांमध्ये केशव लबडे. तसेच मधुकर खडसे.तसेच नाथा खंडारे. ह्यांच्याकडून सर्वांना थंड पाणी उपलब्ध.करून देण्यात आले होते नंदु भाऊ खंडारे यांच्या कडून खाऊ वाटप.R 0 पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस अधिकारी ह्यांच्याकडून देण्यात आलेल्या वेळेत. मिरवणूक समारोप करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला सुरवातीला.गावातले नव्याने नोकरी वर लागलेले .सखाराम सुर्वे.अमोल लबडे. तसेच पोलिस मध्ये लागलेल्या अश्विनी बनसोड. करण बनसोड.ह्यांचे मान्यवरांच्या हस्ते.सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे. प्रमोद भाऊ नवघरे. अमोल नवघरे सर.विठ्ठल भाऊ नवघरे. तसेच पोलिस पाटील. संदीपभाऊ नवघरे ह्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्या नंतर दीपस्तंभ आरकेश्ट्रां वाशीम ह्यांचा भीम गीताचा शानदार कार्यक्रम दशरथ जी खडसे.आणि संच.ह्यांनी सादर केला. सचिनभाऊ नवघरे ह्यांचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौद्ध समाज बांधवांना भोजन दान देण्यात आले होत. सर्व कार्यक्रम पार पडण्याची जबाबदारी. अध्यक्ष.उत्तम खडसे. विठ्ठल खडसे. संतोष वानखेडे. दिलीप खडसे.विठ्ठल.लबडे वर्धमान गुडदे. गणेश खोडके. रमेश बनसोड. गजानन खोडके. जनार्दन खडसे. किसन खडसे. प्रकाश वानखेडे. साहिल गवई.आकाश सुर्वे यांच्यासह उपस्थित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *